पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्व शासकीय कार्यालय ग्रामपंचायत गाव वाडी वस्ती तांड्यावर साजरी करा – गवळी लहु
वडवणी प्रतिनिधी:- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात येत असते, महाराष्ट्रात दरवर्षी 31 मे रोजी गाव, वाड्या, वस्ती ते शहरातील गल्लीत जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते, त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने अनेक जयंतीच्या शासकीय सुट्ट्या दिल्या गेल्या आहेत, या सुट्टीच्या औचित्य साधून समाजातील अनेक घटकांना जयंती उत्सव साजरी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो ,महापुरुषांच्या त्यांनी केलेल्या त्यागाचा व त्यांच्या विचारांच्या आत्मसन्मान करतात 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी,
व देशभरातील सर्व शासकीय कार्यालयात गाववाडी वस्ती तांड्यावर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे दिवशी साजरी करण्यात यावी , असे आव्हान अमर वाघमोडे, सोमनाथ लंबाटे, युवा पत्रकार अंकुश गवळी, गणेश सातपुते ग्रामपंचायत सदस्य टाकरवन, भाई दत्ता प्रभाळे , सुशील बापु कोळेकर,साचिन कोळेकर,शिवराम शिरगिरे, देवगाव ग्रामपंचायत सदस्य गवळी ज्ञानेश्वर सर. पवन माने ,जुनेद भाई शेख, विवेक लवटे, अमोल भावले, अमोल देवकते, विनोद शिंदे, राम शेंडगे, सचिन टेंगल, , अमोल देवकते, कृष्ण कुंडकर , असे आव्हान आदींनी केले आहे,