महाराणी ताराबाई विद्याल्याची उज्वल यशाच्या निकालाची परंपरा कायम ठेवत विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल…
वडवणी प्रतिनिधी :-
वडवणी येथील,महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एचएससी बोर्ड परीक्षेचा निकाल गुरुवार दि.२५ मे २०२३ रोजी जाहीर झालेला असून यामध्ये मुलींनीच मारली बाजी.
महाराणी ताराबाई विद्याल्याचा बारावीचा एकूण निकाल ९९.४६ टक्के लागलेला आहे त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९८.४६ टक्के लागलेला असून उज्वल यशाची निकालाची परंपरा महाराणी ताराबाई विद्यालयांने कायम ठेवलेली आहे.
या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रतिक्षा संभाजी मंत्रे हिने कला शाखेतून ८४.६७ टक्के गुण घेऊन वडवणी तालुक्यातून सर्वप्रथम आली आहे तर विद्यालयातून कु.प्रणिता गणेश कदम हीने ८२.०० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर कु.भूमिका केशव गळांगे हीने ८०.१६ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक आला आहे तसेच विज्ञान शाखेतून कु.कविता हरिकीसन निरडे हिने ७८.३३ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला तर कु.आश्विनी नारायण भोले हीने ७७.०० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर कु.मनीषा गंगाराम गांडगे हीने ७४.८३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक विद्यालयातून आलेला आहे या यशाबद्दल संस्कार शिक्षण मंडळाचे सचिव तथा मा.आ.केशवराव आंधळे साहेब तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.राजेभाऊ वारे, उपाध्यक्ष श्री.संजयभाऊ आंधळे, संचालक तथा युवा उद्योजक श्री.रंजीतभैय्या धस,श्री.इंजिनीयर अशोकभैया आंधळे,विद्यालयाचे प्राचार्य मा.राऊत डी.डी.,उपप्राचार्य मस्के सर, पर्यवेक्षक श्री.धाईतिडक सर अर्थ विभाग प्रमुख श्री.डोईफोडे सर, श्रीमती शोभाताई आंधळे मॅडम यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे एचएससी बोर्ड परीक्षा विभाग प्रमुख प्रा.राहुलजी कांबळे सर तसेच केंद्रसंचालक प्रा.मुंडे बी.डी.,प्रा.मुंडे सी.व्ही.,प्रा.संजयजी केदार, प्रा.अंडील जी.पी.,प्रा.विनायक डाके,प्रा.शिवाजी राठोड,प्राध्यापिका श्रीमती कचरे मॅडम,प्राध्यापिका श्रीमती उघडे मॅडम आदींचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.