19.3 C
New York
Monday, May 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

गेवराईत व्हॉईस ऑफ मीडियाचे पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन..!

  • गेवराईत व्हॉईस ऑफ मीडियाचे पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन..!
  • तहसिलदार सचिन खाडेंना दिले विविध मागण्यांचे निवेदन..!
  • गेवराई : पत्रकार आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गेवराई तहसील कार्यालयासमोर गुरुवार दि.११ मे रोजी तहसीलदार सचिन खाडे यांना पत्रकारांच्या विविध मागण्याचे निवेदन देवून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धरणे आंदोलनास तालुक्यातील पत्रकार बांधवांचा मोठा संख्येने जोरदार प्रतिसाद मिळाला.
    माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र मध्यमकमींच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून पत्रकारांच्या पुढिलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या यामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा., पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा.,पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिरातीही देण्यात याव्यात त्या प्रमाणात साप्ताहिकांनाही जाहिराती द्याव्यात या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद नरसाळे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत जाधव, तालुकाध्यक्ष विनोद पौळ, कार्याध्यक्ष राजेश राजगुरु, प्रा.सुनिल मुंडे, वैजीनाथ जाधव, मंगेश चोरमले, विष्णू गायकवाड, विनायक उबाळे, तुकाराम धस, अजहर इनामदार, आर.आर. बहिर, आतिखभाई शेख, कामराज चाळक, विनोद खरात, बाबु कोकाट, सचिन डोंगरे, शेख आसेफ यांच्यासह आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!