बीड बाजार समिती च्या सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम होणार शुक्रवारी..!
- बीड बाजार समिती च्या सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम होणार शुक्रवारी..!
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,9 : कृषी उत्पन्न बाजार समिती बीडच्या सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सन 2023 ते सन 2028 या पाच वर्षासाठी सभापती व उपसभापती यांच्या निवडीसाठी दिनांक 12 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य कार्यालय बीड या ठिकाणी विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
- कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. महाआघाडीने 18 जागापैकी 15 जागा जिंकून बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चाळीस वर्षापासूनच्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सत्तेला सुरुंग लावत महाआघाडी सत्तेत आली आहे. बाजार समिती महाआघाडीच्या ताब्यात आली आहे आता सभापती व उपसभापती यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
- शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी सभापती व उपसभापती यांच्या निवडीसाठी सहकारी संस्थेचे उपनिबंधक जी.के. परदेशी यांची प्राधिक्रत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेत बाजार समिती सभापती व उपसभापती हे पद निवडले जाणार आहे.
error: Content is protected !!