नालंदा बुद्ध विहार च्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..!
- नालंदा बुद्ध विहार च्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..!
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- येळंब घाट दि,६ : नालंदा बुद्ध विहार च्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम सकाळी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर बुद्ध वंदना हि फुले शाहू आंबेडकर मोफत कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी घेतली. नंतर उपासक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.महिलांनी गीताच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर दुपारी बारा वाजता माता रमाई महिला मंडळाच्या वतीने सर्व महिलांनी मिळून खीर बनवली व बुद्ध वंदना घेऊन खीर दान करण्यात आली.
- सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये झालेल्या या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने महिला,पुरुष, लहान मुले हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!