येळंब घाट येथे भीम जन्मोत्सव 2023 मोठया उत्साहात साजरा करण्यात आला..!
- येळंब घाट येथे भीम जन्मोत्सव 2023 मोठया उत्साहात साजरा करण्यात आला..!
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,1: बीड तालुक्यातील येळंबघाट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 14 एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थित ध्वजारोहण व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
- दिनांक 26 एप्रिल रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा,रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. दिनांक 27 एप्रिल रोजी भीम गीताचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून माननीय मुस्ताफा (एपीआय पोलीस स्टेशन नेकनूर) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिनांक 28 एप्रिल रोजी नृत्य स्पर्धा व दिनांक 29 एप्रिल रोजी विनोदी नाटक ‘गावची जत्रा पुढारी १७’ हे नाटक जयंतीनिमित्त येळंब घाट या ठिकाणी सादर करण्यात आले. दिनांक 30 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्य आकर्षण हे लेझर शो होता.
- भीम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी अध्यक्ष बुद्धभूषण वंजारे, शिवम वंजारे,दयानंद गायकवाड, अभिषेक वंजारे, ऋषिकेश शिनगारे संजय वंजारे, रोहित वंजारे व सर्व समितीतील सदस्यांनी कष्ट घेऊन कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडले.
- सामान्य ज्ञान संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धेचे बक्षीस निलेश लंके प्रतिष्ठानचे सुमित पवळे व राजेश जाधव यांच्या स्मरणार्थ संयुक्त विद्यमाने बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी गावातील सरपंच ग्राम पंचायत सदस्य महिला पुरुष गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!