- जलजीवन च्या कामाची होणार चौकशी:,बीडमध्ये येणार राज्यस्तरीय समिती..!
- ♦️कामाच्या पाहणीसह दफ्तराची होणार तपासणी..
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि २६ :बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. अपात्र आणि अनियमीतता करून काही गुत्तेदारांना कामाचे वाटप करण्यात आले आहे. असे आरोप-प्रत्यारोप विधानसभेच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशानात झाल्याने बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनेची कागदपत्रे तपासणी, काही प्रत्यक्षात चालु असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्रालयातील मुख्य अभियंता आणि उपसचिव दर्जाचे अधिकारी समिती बीड जिल्ह्याच्या दौर्यावर येत असुन ज्या गुत्तेदाराने बनावट कागदपत्रे सादर करून काम प्राप्त करून घेतले आहे असे गुत्तेदार आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकारी यांच्यात मात्र घबराट निर्माण झाली आहे.
- बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अनेक अपात्र असलेल्या गुत्तेदाराला कामच दिल्याचा ठपका विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजला, त्या अनुषंगाने राज्याचे पाणीपुरवठा योजनेचे मुख्यअभियंता, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव, जलजीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता, प्रादेशिक अभियंता या सर्वांची समिती बीड जिल्ह्यात दाखल होत असुन त्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात गेल्या आठ दिवसांपासून व्यस्त आहेत, तर ज्यांना कामाचे वाटप झालेले आहे अशा गुत्तेदारांना काम चांगले करण्याच्या सूचना सातत्याने पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात येत आहेत. ज्या अधिकारी, कर्मचार्यांनी अनियमीतता केली आहे त्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.उद्या येणारी राज्यस्तरीय चौकशी समिती खरच दोषीवर ठपका ठेवणार आहे की नेहमीप्रमाणे दोन दिवस येवुन चौकशीचा फार्स करून जाणार आहे, हे मात्र समिती येवुन गेल्यानंतर कळेल.