24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड जिल्ह्यात दि.24 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता..!

  • बीड जिल्ह्यात दि.24 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता..!
  • ♦️जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे  आदेश..
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  • बीड दि,23: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 22 एप्रिल, 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यासाठी दिनांक 24 एप्रिल, 2023 ते 26 एप्रिल, 2023 या दिवसासाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 24 एप्रिल, 2023 ते 26 एप्रिल, 2023 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. खबरदारीची उपायोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घेण्यात यावी.
  • या गोष्टी करा:
    1) विजेच्या गडगडासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
    2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
    3) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
    4) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.
    5) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
  • या गोष्टी करू नका:
    1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करू नका.
    2) घरातील बेसिन चे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नका.
    3) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असतांना लोखंडी धातूच्या साहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
    4) उंच झाडांच्या खाली आसरा घेऊ नका.
    5) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका.
    6) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना बाहेर पाहू नका, हे बाहेर थांबणे इतकेच धोकादायक आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!