चाकरवाडी मध्ये 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..
बीड प्रतिनिधी – चाकरवाडी मधील 23 वर्षीय तरुण युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेत पंचनामा केला. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. चाकरवाडी (ता. जि. बीड ) येथील एका शेतातील बाभळीच्या झाडाला नाव – रोहित घोडके वय – 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनुर कुटीर रुग्णालयामध्ये पाठविला.
याबाबत अधिक तपास नेकनुर पोलीस करीत आहेत. अचानक घटना कळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.