28.5 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये मंगळवार पासुन अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात…!

  • श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये मंगळवार पासुन अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात…!
  • बीड प्रतिनिधी – गुरुवर्य तपोनिधी बाळनाथ महाराज यांच्या पुणयतिथीनिमित्त महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विसाव्या शतकातील महान संत विभूती ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच श्री. ह.भ.प तपोनिधी शांतीब्रम्ह महादेव महाराज तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला गुरुवर्य तपोनिधी बाळनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाची सुरूवात मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 पासून सुरुवात होत आहे.
  • कलश पूजन व दीप प्रज्वलन करून सप्ताह प्रारंभ करण्यात येणार आहे. व्यासपीठ पुजन ह. भ. प नवनाथ महाराज गिरी तलवाडा, ह. भ. प हनुमान महाराज घोलप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दररोज सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 3 ते 4 ज्ञानेश्वरी प्रवचन, 4 ते 5 हरिपाठ तसेच रात्री 8 ते 10 महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन होणार आहे तसेच मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी श्री ह भ प माऊली महाराज जगताप पालसिंगण यांचे सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा होईल. तरी सर्व कार्यक्रमाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. ह.भ.प तपोनिधी शांतीब्रह्म महादेव महाराज तात्या, ओम श्री गुरु चैतन्य बाळनाथ महाराज संस्थान व समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र चाकरवाडीकर यांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!