26.6 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

जि प प्रा शाळा व ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी..!

  • जि प प्रा शाळा व ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठया उत्साहात साजरी..!
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
  • बीड दि,१४: बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथे जि प प्रा शाळा या ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.
  • जयंती निमित्त शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सर,जाधव सर, शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक जगदाळे सर व जाधव सर यांनी जयंती निमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ फोडून सर्वांनी जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन केले.
  • तसेच ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट या ठिकाणी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली.
  •  जयंतीनिमित्त गावचे सरपंच पप्पू जगताप, वैभव जगताप, सोमनाथ टेकडे, संगणक चालक अंगद घोरपडे, सुरेश घोरपडे, पत्रकार दिपक वाघमारे यावेळी उपस्थित होते.सरपंच पप्पू जगताप यांनी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ फोडून जयंती निमित्त महामानवाला अभिवादन केले.उपस्थित सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हात जोडून सर्वांनी महामानवाला अभिवादन केले.
  • भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे, भारताच्या इतिहासातील तेजस्वी असे प्रज्ञासूर्य ज्यांच्या ज्ञानतेजाने कोट्यवधी जनतेची आयुष्ये उजळली…
  • आधुनिक भारत घडवून आणण्यासाठी अमूल्य असे योगदान देणारे कृतिशील महापुरुष … स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्यांनी स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय अशा तत्त्वांवर आधारित राज्यघटना तयार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत भारताच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरविली.. ज्यांनी हजारो वर्षे बहिष्कृत करण्यात आलेल्या समाजाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली व त्यांना संघटित केले; त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, अन्यायाविरूध्द लढण्याची जिद्द, वाईट चालीरीती सोडून देण्याची प्रवृत्ती, शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला असे महापुरुष…
  • आपल्या क्रांतिकारी विचारांनी ज्यांनी सामाजिक अभिसरण घडवून आणत राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक जीवनात अस्पृश्यांना मानाचे स्थान मिळवून दिले आणि वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार मिळवून दिले असे महानायक… पहिले भारतीय अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित…. ज्यांनी दीन दलित समाजाला शांती आणि समता यांची शिकवण देणारा बौद्ध धम्म दिला… या विविध क्षेत्रांत काम केलेला जगात बाबासाहेबांसारखा एखादाच नेता म्हणून त्यांचे स्थान अढळ आहे.
  •  अशा भारतरत्न महामानव  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती जि प प्रा शाळा व ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!