17.2 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..!

  • बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..!
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  •  बीड दि,१२: बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेने व वै ह.भ.प गिरी महाराज व ज्ञानेश्वर माऊली,सुदाम देव महाराज, गुरुवर्य शांती ब्रह्म रामहरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे व महादेव महाराज (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्यावतीने वार गुरुवार दिनांक १३ /४/ २०२३ रोजी मौजे अंधापुरी घाट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
  •  अखंड हरिनाम सप्ताह निमित्त गावामध्ये ह भ प महादेव महाराज (तात्या) चाकरवाडीकर व ह भ प  साहेबराव लहाने महाराज यांच्या हस्ते कलशपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
  •  सात दिवस चालणाऱ्या या सप्ताह निमित्त गावामध्ये रोज वेगवेगळ्या नामांकित कीर्तनकारांचे अमृततुल्य असे किर्तन सेवा होणार आहे तसेच प्रसिद्ध प्रवचनकारांचे प्रवचने व हरी जागराचे कार्यक्रम होणार आहेत.
  •  अखंड हरिनाम सप्ताह निमित्त गावामध्ये रोज गावकऱ्यांच्या वतीने व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्यावतीने सप्ताह निमित्त महापंगतीचे आयोजन करण्यात आले असून रोज सकाळ संध्याकाळ गावामध्ये वेगवेगळ्या महापंगती होणार असून परिसरातील भावीक भक्तांनी, नागरिकांनी व गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन अंधापुरी घाट येथील गावकऱ्यांच्या वतीने व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
  •  अखंड हरिनाम सप्ताह निमित्त गुरुवार दिनांक २०/ ४/ २०२३ रोजी श्री गुरुवर्य ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे  (मठाधिपती बंकट स्वामी संस्थान निनगुर,आळंदी,पंढरपूर) यांचे सकाळी ११ ते १ या वेळेत अमृततुल्य असे काल्याचे किर्तन होणार असून नंतर लगेचच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी परिसरातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी व नागरिकांनी तसेच गावकऱ्यांनी काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांच्या वतीने व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!