9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

केज येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहावे-नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड.

 

केज येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहावे-नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड.

निर्धार नगरपंचायतचा; कायापालट केज शहराचा

केज /प्रतिनिधी –दिनांक २९ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता केज नगरपंचायत येथे केज नगरपंचायत अंतर्गत केज शहरातील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सौ‌ नमिताताई मुंदडा तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे नेते तथा जनविकास परिवर्तन आघाडीचे मार्गदर्शक रमेशरावजी आडसकर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर काका मुंदडा, युवा नेते अक्षय भैया मुंदडा, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश अण्णा इंगळे, जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूनभाई इनामदार, माजी नगराध्यक्ष आदित्य दादा पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, शिवसेना तालुकाध्यक्ष रत्नाकर आप्पा शिंदे, केज रोटरी क्लब ऑफचे अध्यक्ष पशुपतिनाथ दांगट, ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप गुळभिले, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, भाजपचे डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नेहरकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. त्रिंबक चाटे, आर. पी. आय. चे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष महादेव सूर्यवंशी विशेष उपस्थिती उपजिल्हाधिकारी शरद झाडगे साहेब, तहसीलदार दुलाजी मेंडके साहेब, हिंगोली व नांदेड महिला संपर्कप्रमुख सौ. रत्नमालाताई मुंडे, माजी सरपंच युवराज दादा काळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केशव कदम, जनविकास परिवर्तन आघाडीचे गटनेते राजूभाई इनामदार, राष्ट्रवादीचे गटनेते रामचंद्र गुंड, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गलांडे, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष रंजीत घाडगे, डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष रामदास तपसे, सह्याद्री पत्रकार संघाचे अध्यक्ष जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी केज येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोड, उपनगराध्यक्षा सौ.शितलताई दांगट, केज नगरपंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी महेश गायकवाड, केज नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व केज नगरपंचायत चे सर्व कर्मचारी यांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!