14.5 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

टाकरवन च्या मेंढपाळाच्या मुलांची भारतीय सैन्य दलात निवड…..!

टाकरवन च्या मेंढपाळाच्या मुलांची भारतीय सैन्य दलात निवड…..!

महादेव सातपुते ने आई-वडिलांचे स्वप्न साकार केल..

बीड प्रतिनिधी-अंकुश गवळी

माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील शिवाजी सातपुते यांचा मुलगा महादेव शिवाजी सातपुते यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे, गरीब कुटुंबातील महादेव ने यश संपादन केल्याने कुटुंबासाठी तसेच गावकऱ्यासाठी अभिमानाची बाब आहे, या निवडीबद्दल गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या , व मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला, आहे तर मित्रांनी डीजे लावून गावातून मिरवणूक काढली, कुटुंबात कोणीच नोकरीत नाही मुख्य व्यवसाय मेंढपाळ हा असुन कुटुंबाच्या उदरनिर्वा करत शिवाजी सातपुते यांनी मुलाचे शिक्षण केले , टाकरवन येथील महादेव शिवाजी सातपुते यांनी आई-वडिलांचे परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करत मेहनतीने भारतीय सैन्य दलात यश संपादन केले , सैन्य दलात निवड झाल्याची आनंदाची बातमी गावात कुटुंबात समजतात, पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी महादेव सातपुते यांच्यावर परिसरातील मित्रपरिवारांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!