22.5 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

नामदेव मंदिरासाठी भरघोस निधी मिळून देण्यास कटिबद्ध. राहुल कल्याणकर…!

नामदेव मंदिरासाठी भरघोस निधी मिळून देण्यास कटिबद्ध. राहुल कल्याणकर…!

बीड जिल्हा प्रतिनिधी – चंद्रकांत नन्नवरे

बीड प्रतिनिधी – नामदेव मंदिराच्या विविध कामांसाठी भरघोस निधी मिळून देण्यास प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राहुल कल्याणकर यांनी केले. नेकनूर येथील नामदेव मंदिरात सोमवारी दि.२३ रोजी नामदेव समाजोन्नती
परिषद मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिंपी समाजाच्या वतीने राहुल कल्याणकर तसेच नुकतेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ज्यांच्या रानमेवा या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले असे लेखक संदीप खुरुद यांचा नामदेव महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. भविष्यात नामदेव मंदिरात विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्न करणार असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले. यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकरराव कल्याणकर,
माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फुटाणे, उमेश होमकर, श्रीरंग होमकर, जगदीश पिसे, संतोष खुरूद, गोविंद मुळे, पत्रकार शिवाजी वनारसे,
प्रविण बोधे, बाळू पिसे, मुन्ना होमकर, ज्ञानेश्वर बोंडगे, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कोळेकर यांनी केले तर आभार पुरुषोत्तम पिसे यांनी मानले. यावेळी बोलताना संदीप खुरुद म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीतून अभ्यास करून नोकरी मिळवली. पण माझ मुख्य ध्येय हे लेखक होण्याचं होत. नोकरी करत मी माझा लेखन व वाचनाचा छंद जोपासला आहे. आज रानमेवा कथासंग्रह संपूर्ण महाराष्ट्रात छापील स्वरूपात प्रकाशित झाला असून अमेझॉन वर देखील उपलब्ध आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!