प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचा झेंडा; डॉ. सारिका क्षीरसागर यांचा दणदणीत विजय
- प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचा झेंडा; डॉ. सारिका क्षीरसागर यांचा दणदणीत विजय
- शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधून भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. भाजपाच्या नेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी प्रभाग क्रमांक 15 मधून दणदणीत विजय मिळवत मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. त्यांच्या विजयासोबतच या प्रभागातून भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- या निवडणुकीत मतदारांनी विकास, पारदर्शक कारभार आणि प्रभावी नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांना आणि नागरिकांशी असलेल्या थेट संवादाला मतदारांनी पसंती दिल्याचे या निकालातून दिसून येते. या विजयामुळे प्रभाग क्रमांक 15 वर भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात नागरी सुविधा, पायाभूत विकास व लोकहिताच्या कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
error: Content is protected !!