7.1 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

गेवराईत भाजपचा झेंडा; राष्ट्रवादीला केवळ ४ जागांवर समाधान

  • गेवराईत भाजपचा झेंडा; राष्ट्रवादीला केवळ ४ जागांवर समाधान
  • अजित पवार गटाला धक्का; शीतल दाभाडे यांचा पराभव
  • गेवराई | प्रतिनिधी: गेवराई नगर परिषदेच्या २० नगरसेवक पदांची मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत भाजपने मोठे वर्चस्व सिद्ध केले आहे. निकालानुसार भाजपचे १६ नगरसेवक विजयी झाले असून राष्ट्रवादी चे ४ नगरसेवक निवडून आले आहेत.
  • या निकालासोबतच गेवराई नगराध्यक्षा पदासाठी सौ. गिताभाभी बाळराजे दादा पवार यांनी विजय मिळवला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने शहराच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक बळकट झाली आहे.
  • दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार शीतल महेश दाभाडे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
  • गेवराई शहराच्या विकासाच्या दृष्टीने आता भाजपप्रणीत नगर परिषद कार्यरत होणार असून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. निवडणूक निकाल जाहीर होताच शहरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!