अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक : नंदकिशोर मुंदडा २५१० मतांनी विजयी
- अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक : नंदकिशोर मुंदडा २५१० मतांनी विजयी
- अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत नंदकिशोर मुंदडा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा २५१० मतांनी पराभव करत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले आहे.
- या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत नंदकिशोर मुंदडा यांनी आघाडी घेतली होती. अखेर अंतिम निकालात त्यांचा स्पष्ट विजय जाहीर झाला. त्यांच्या विजयामुळे समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- नंदकिशोर मुंदडा हे भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे असून, त्यांच्या विजयामुळे अंबाजोगाई शहराच्या राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला.
- विजयानंतर बोलताना नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाईकर जनतेचे आभार मानले. शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांचे बळकटीकरण, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नागरी समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने दाखवलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
error: Content is protected !!