गेवराई नगर परिषद निवडणूक : दहा नगरसेवकांचा निकाल जाहीर
- गेवराई नगर परिषद निवडणूक : दहा नगरसेवकांचा निकाल जाहीर
- गेवराई नगर परिषद निवडणुकीत दहा नगरसेवकांचा निकाल हाती आला असून या निकालात सत्ताधारी व विरोधी पक्षांना मिळून प्रतिनिधित्व मिळाले आहे. प्राप्त माहितीनुसार या दहा जागांपैकी आठ जागांवर भाजप समर्थित उमेदवारांनी विजय मिळवला आहे, तर उर्वरित दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवार विजयी झाले आहेत.
- या निकालामुळे नगर परिषदेत राजकीय समीकरणे स्पष्ट होत असून पुढील टप्प्यातील मतमोजणी व उर्वरित जागांचे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रारंभीच्या निकालांमुळे भाजपला आघाडी मिळाल्याचे चित्र असले तरी अंतिम निकालानंतरच नगर परिषदेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होणार आहे.
error: Content is protected !!