केंद्रस्तरीय स्पर्धेत विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेची घवघवीत यशस्वी कामगिरी
- केंद्रस्तरीय स्पर्धेत विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेची घवघवीत यशस्वी कामगिरी
वक्रुत्व, वेशभूषा व गीतगायन स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींचे चमकदार यश
- खरवंडी : नेवासा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी केंद्रस्तरीय विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
- केंद्रस्तरावर घेण्यात आलेल्या बालगट व कीलबील गट स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रथम व तृतीय क्रमांक पटकावून यशाची परंपरा कायम राखली.
- बालगट स्पर्धेत वक्रुत्व स्पर्धेत चैताली कु-हे हिने प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य सिद्ध केले. तसेच वेशभूषा स्पर्धेत श्रावणी संतोष तांदळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. याच विद्यार्थिनीने वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत बहुआयामी गुणवत्ता दाखवली.
- दरम्यान, कीलबील गट वक्रुत्व स्पर्धेत सिध्दी सुनील तांदळे हिने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
- या सर्व यशामागे शाळेतील शिक्षक कदम मॅडम व राऊत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत व विद्यार्थिनींना दिलेले योग्य प्रशिक्षण कारणीभूत ठरले आहे. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
error: Content is protected !!