6.4 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

घर फुटलं… आधाराचा खांब आजारी, आणि चुलत्यांचे अजुन ठरेना— योगेशभैय्यांची सर्वात कठीण परीक्षा

योगेश क्षीरसागर यांच्या शिवाय बीड ला पर्याय नाही..

घर फुटलं… आधाराचा खांब आजारी, आणि चुलत्यांचे अजुन ठरेना— योगेशभैय्यांची सर्वात कठीण परीक्षा

अजित दादांचा हात निसटला, क्षीरसागर भाजपकडे वळले; बीडमध्ये ‘कोण कोणाचा?

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सूत्र शिवछत्र वरून हलतात..

बीड | प्रतिनिधी

बीड शहराच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत इतक्या झपाट्याने उलथापालथ झाली आहे की, कोण कोणाच्या बाजूला आहे आणि कोणाचा हात निसटला याचाच हिशोब नेता-सर्मथकांना लागत नाही. सर्वात मोठं वळण म्हणजे अजित दादांच्या राष्ट्रवादीत असणारे योगेश क्षीरसागर आता जनता विकास आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगत आहे. बीडमधील नेहमीच गोंधळात टाकणारा राजकीय खेळ पुन्हा एकदा नवीन अध्यायात प्रवेश करताना दिसतोय. अजित दादांचा ‘आश्रयाचा हात’ निसटल्याच्या चर्चा जोरात आहे. राष्ट्रवादीच्या शहरातील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक असलेले डॉ. योगेश क्षीरसागर हे अजित दादांचे “विश्वासाचे मोहरे” म्हणून परिचित होते. परंतु आता त्यांच्या डोक्यावरून तो हात हलू लागल्याच्या कुजबुजीने शहरातील सर्वच गटांत खळबळ उडाली आहे. परंतु योगेश क्षीरसागर यांचे घर फुटलं… आधाराचा खांब आजारी, आणि चुलतेही सावली काढून गेले योगेशभैय्यांची सर्वात कठीण परीक्षा सुरू झालेली आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद, काही निर्णयांवर वाढलेला असंतोष आणि नगरपालिकेतील समीकरणे यामुळे क्षीरसागरांनी स्वतःचा वेगळा मार्ग शोधण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रं सांगतात.

क्षीरसागरांचा ‘नवा राजकीय रस्ता’ : भाजपसोबत नवी आघाडी?

भाजपसोबत मजबूत समन्वय आणि नवीन शक्तिकेंद्र निर्माण करण्याच्या तयारीत ‘जनता विकास आघाडी’ हा नवीन प्रकल्प चर्चेत आला आहे. क्षीरसागरांच्या या हालचालीमुळे शहरात सर्वत्र एकच वाक्य ऐकू येतंय क्षीरसागर आता भाजपसोबत, नगरपालिकेचे सूत्र बदलू लागले; परंतु आता नगरपालिकेचे रिमोट कंट्रोल शिवछत्र वरील विजयसिंह पंडित यांच्या हातात सरकल्याची मोठी चर्चा आहे. नगरसभागृहात व शहरातील पॅनेल्समध्ये पंडित यांची सायलेंट पण प्रभावी हालचाल दिसू लागली आहे.
यामुळे अजित दादांच्या गटातील काही सर्वच कार्यकर्ते शिवछत्र वर पोहोचले आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!