जानेवारी अखेरपर्यंत पदवी प्रमाणपत्रावरील दंड माफ
- जानेवारी अखेरपर्यंत पदवी प्रमाणपत्रावरील दंड माफ
- पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेचा निर्णय
- छत्रपती संभाजी नगर, दि.९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रावरील दंड व विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.बी एन डोळे यांनी दिली.
- सन डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूकाची नवीन मतदान नोंदणी सध्या सुरू असून या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक मा.कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप व सहकारी यांनी पदवी प्रमाणपत्रावरील दंड माफ करण्याची मागणी केली. या बैठकीत सदर ठराव मान्य करण्यात आला.
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रात गेलेल्या व १९९४ पूर्वी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे. येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत विद्यापीठातून आत्तापर्यंत पदवी न घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची पदवी विनाविलंब शुल्क प्राप्त करता येणार आहे. पदवी, पदव्युत्तर पदवी, एमफील व पीएचडी प्रमाणपत्रासाठी याचा फायदा होणार आहे.१० नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कार्यकाळात दंड माफ मोहीम लागू असणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले पदवी प्रमाणपत्र प्राप्त करावी , असे आवाहन डॉ. डोळे यांनी केले आहे.
error: Content is protected !!