9.9 C
New York
Saturday, November 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

बरड फाटा परिसर बनला जुगाऱ्यांचा अड्डा..

  • बरड फाटा परिसर बनला जुगाऱ्यांचा अड्डा..
  • केज पोलिसांनी केली चार व्यक्तीवर कारवाई..
  • केज प्रतिनिधी – रात्री दिव्याच्या उजेडात तीर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या चार जुगाऱ्यांना रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे.
  • दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर हे त्यांचे सहकारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलिस हवालदार प्रकाश मुंडे आणि पोलिस हवालदार गोरख फड हे रात्र गस्त घालत असताना त्यांना एका गुप्त खबऱ्याने माहिती दिली की, केज येथे केज – बीड रोडवर असलेल्या रेणुका पेट्रोल पंपाजवळ पंपावर लावलेल्या विजेच्या दिव्याच्या उजेडात काही इसम चार तीर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने छापा मारला त्यावेळी अशोक दादाराव भोसले वय (४० वर्ष), प्रदिप प्रभाकर भोसले वय (२४ वर्ष) दोघे (रा. पांढऱ्याचीवाडी ता. केज), दादाराव भगवान भोसले वय (४२ वर्ष) आणि गोकुळ चत्रभुज भोसले वय (३२ वर्ष) दोन्ही (रा. खरडेवाडी ता.बीड) असे चौघे गोलाकार बसून तीर्रट नावाचा जुगार खेळत होते.
  • पोलिसांनी त्या चौघांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे रोख १३ हजार रु. आणि दोन मोबाईल असा एकूण ४५ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले.
  • सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर यांच्या फिर्यादी वरून चौघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६००/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३, ४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
  • पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!