राधिका हॉटेलचे मालक सुग्रीव अण्णा रसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन..
बीड प्रतिनिधी – मांजरसुंबा येथील प्रसिद्ध राधिका हॉटेलचे मालक सुग्रीव अण्णा रसाळ (वय अंदाजे 50 वर्षे) यांचे दुपारी 2 च्या दरम्यान अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांमध्ये , जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुग्रीव अण्णा हे गेल्या अनेक वर्षांपासून राधिका हॉटेलच्या माध्यमातून प्रवासी व ग्रामस्थांची सेवा करत होते. त्यांचा हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभाव तसेच समाजकार्यातील सहभाग यामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून होते.
आज दुपारी त्यांना अचानक छातीत वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी बीड येथील मेडिकेअर हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मांजरसुंबा परिसरातील व्यापारी वर्ग, मित्रपरिवार व समाजात शोककळा पसरली आहे.
अंत्यसंस्कार मांजरसुंबा येथे सायंकाळी 8 वाजता पार पडणार असल्याचे नातेवाईकांकडून कळते.
भावपूर्ण श्रद्धांजली — सुग्रीव अण्णा रसाळ यांच्या आत्म्यास शांती लाभो.


