दैनिक बीड माऊली’चे संपादक अभिजीत पवार यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार 2025’ जाहीर!
- दैनिक बीड माऊली’चे संपादक अभिजीत पवार यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार 2025’ जाहीर!
- पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल!
- बीड प्रतिनिधी – पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि सामाजिक भान जपणाऱ्या बातमीदार वृत्तीबद्दल ‘दैनिक बीड माऊली’चे संपादक अभिजीत पवार यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार 2025’ हा राष्ट्रीय सन्मान जाहीर झाला आहे.
- हा पुरस्कार त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकी, सत्यनिष्ठ पत्रकारिता आणि लोकहितासाठी केलेल्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात येत आहे. देशभरातून निवड झालेल्या नामवंत व्यक्तींमध्ये अभिजीत पवार यांचे नाव झळकले असून, बीड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.अभिजीत पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय राहून समाजातील विविध विषयांवर निर्भीडपणे लेखन केले आहे. सामाजिक प्रश्न, शेतकरी समस्या, तरुणांचे प्रश्न, आणि लोकहिताचे मुद्दे यावर त्यांनी सातत्याने लेखणी फिरवली आहे. सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेचा ध्यास घेत, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे.
- राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या एका भव्य सोहळ्यात लवकरच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्थानिक पत्रकार आणि नागरिकांनी अभिजीत पवार यांना या यशाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन दिले आहे.
error: Content is protected !!