8.3 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

हातावर सुसाईड नोट लिहीत संपवलं आयुष्य.. “बापानं घाम गाळून लेकीला डॉक्टर बनवलं… पण खाकीच्या हैवानीनं सगळंच उद्ध्वस्त केलं!”

हातावर सुसाईड नोट लिहीत संपवलं आयुष्य..

“बापानं घाम गाळून लेकीला डॉक्टर बनवलं… पण खाकीच्या हैवानीनं सगळंच उद्ध्वस्त केलं!”

बीड -फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डॉ. संपदा मुंडे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांच्या मृत्यूमुळे फलटण परिसरात तसेच वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

ही घटना गुरुवारी रात्री उशिरा समोर आली. काही दिवसांपूर्वीच संपदा मुंडे यांनी माझ्यावर अन्याय होत असल्याचं म्हणत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. अखेर काल रात्री त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहीली आहे. नेमकं काय घडलं? सुसाईड नोट मध्ये काय आहे. डॉ. संपदा मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीमुळे आणि सततच्या दबावामुळे त्या मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा होती. यासंदर्भात डॉ. संपदा मुंडे यांनी यापूर्वी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार देऊन “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” असा इशाराही दिला होता. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी शेवटी टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसत आहे.
फलटणमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यामधील महत्वाची माहिती म्हणजे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले आहे. त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकरणाने फलटण तसेच संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्ये लिहिली होती. या मजकुरात त्यांनी नमूद केले आहे की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला.”

वैद्यकीय क्षेत्रात डॉ. मुंडे यांच्या मृत्यूमुळे संताप आणि दु:खाचे वातावरण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सहकारी डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाने मागणी केली आहे. “एक समर्पित आणि प्रामाणिक डॉक्टर अशा प्रकारे जगाचा निरोप घेतील, हे विश्वास बसणारं नाही,” अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. फलटण पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू झाला असून, आत्महत्येच्या कारणांवर प्रकाश टाकण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी सेवांतील दबाव, अंतर्गत राजकारण आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्या हातावर आढळलेल्या लिखाणामुळे आत्महत्येचे प्रकरण आता गुन्हेगारी चौकशीच्या टप्प्यावर गेले आहे. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!