असारडोह जिल्हा परिषद गटातून ऋषिकेश गडदे यांना पसंती..
- असारडोह जिल्हा परिषद गटातून ऋषिकेश गडदे यांना पसंती..
- धारूर प्रतिनिधी – असारडोह जिल्हा परिषद गटामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण आणि उत्साही नेतृत्व म्हणून ऋषिकेश गडदे यांच्या नावाला स्थानिक पातळीवर मोठी पसंती मिळत आहे. शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना प्रबळ पाठबळ मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
- जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद आणि लोकांच्या प्रश्नांवर तत्पर प्रतिसाद या गुणांमुळे ऋषिकेश गडदे हे असारडोह परिसरात लोकप्रिय झाले आहेत. ग्रामविकास, शिक्षण, आणि तरुणांच्या रोजगाराच्या संधींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
- स्थानिक नागरिकांच्या मते, “असारडोहला खऱ्या अर्थाने तरुण नेतृत्वाची गरज होती, आणि ऋषिकेश गडदे हे त्या अपेक्षांना पूर्ण उतरतील,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
error: Content is protected !!