“राशनचे तांदूळ माणसांसाठी की जनावरांसाठी?” — नागरिकांमध्ये संतापाची लाट!
बीड प्रतिनिधी – नेकनूर परिसरात शासकीय राशन दुकानातून वाटप होणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांचा आरोप आहे की, सध्या मिळणारा तांदूळ इतका निकृष्ट दर्जाचा आहे की तो माणसांना नव्हे तर जनावरांनाही योग्य नाही.
गावातील काही नागरिकांनी सांगितले की, तांदळात दगड, धूळ व कुजलेले दाणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे हा तांदूळ खाण्यायोग्य नसून आरोग्याला हानिकारक ठरू शकतो.
स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की संबंधित राशन दुकानांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नागरिकांना दर्जेदार धान्य पुरवले जावे. गोरगरिबांना मदतीचा हेतू ठेवून शासनाने ही योजना सुरू केली असली, तरी प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्यामुळे गरिबांच्या ताटात आरोग्याचा धोका वाढत आहे.आम्ही शासनावर विश्वास ठेवून राशन घेतो, पण जर तांदूळ जनावरांनाही नकोसा वाटतो, तर हा न्याय आहे का?”