- गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा ‘एकनाथांचा सेवक’ बाजीरावच!
- प्रताप सरनाईक साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत बाजीरावने दाखवली खरी जनसेवा..
- बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारसरणीने प्रेरित होत, समाजातील गोरगरिबांच्या मदतीला नेहमीच तत्पर राहणारा बाजीराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने “जनसेवक” ठरले आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे साहेब, पुर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात बाजीराव चव्हाण यांनी दिला आहे. - कोणतीही आपत्ती असो वा अडचण — मदतीसाठी पहिला हात पुढे करणारा व्यक्ती म्हणजेच बाजीराव चव्हाण साहेबच आहेत. प्रताप सरनाईक साहेब यांच्या वतीने बाजीराव चव्हाण यांची जन्मभूमी असणाऱ्या इमामपूर या ठिकाणी त्यांनी गरीब, पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट, धान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करून समाजसेवेचा उत्कृष्ट आदर्श ठेवला. विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी फटाके साहित्य देऊन ‘एकनाथांचा सेवक’ हा बिरुदार्थक सिद्ध केला.
- प्रताप जी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाजीराव चव्हाण यांच्या कार्यामुळे परिसरात नव्हे तर राज्यात एक वेगळी सामाजिक जागरूकता निर्माण होत असून, जनतेमध्ये “सेवक नव्हे तर आपलाच माणूस” अशी भावना रुजली आहे. बाजीराव चव्हाण यांच्या या सेवाभावी कार्यामुळे परिसरात ‘एकनाथांचा खरा सेवक’ म्हणून त्यांना मानाचा मुजरा दिला जात आहे.
- महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी झाल्यामुळे बाजीराव चव्हाण यांनी शेकडो गरीब कुटुंबांना अन्नधान्य आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे, कोणतेही राजकीय स्वार्थ न बाळगता ‘सेवा हाच धर्म’ या तत्वावर ते कार्यरत आहेत. बाजीराव चव्हाण यांनी या वर्षी गोर गरिबांची दिवाळी गोड केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “बाजीराव चव्हाण हे फक्त नाव नाही तर समाजसेवेची एक प्रेरणा आहेत. अडचणीच्या काळात ते प्रत्येक गरजूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.
संकटात सापडलेल्या कोणत्याही नागरिकाला मदतीची गरज भासल्यास बाजीराव चव्हाण हेच सर्वप्रथम धाव घेतात. त्यामुळेच लोक म्हणतात — “एकनाथांचा सेवक कोण? तर गोरगरिबांच्या मदतीला नेहमी तत्पर असलेले बाजीरावच!” - व्हिडिओ कॉलद्वारे प्रताप सरनाईक साहेब यांनी केला इमामपूर येथील जनतेशी संवाद.
जनतेच्या अडचणी आणि स्थानिक विकास विषयांवर चर्चा करण्यासाठी समाजसेवक बाजीराव चव्हाण यांनी प्रताप सरनाईक साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे जनतेशी थेट संवाद साधला. गरजूंसाठी होणाऱ्या मदतीबाबत मोकळेपणाने मते व्यक्त केली साहेबांनी सर्व गावकऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा ‘एकनाथांचा सेवक’ बाजीरावच!
