कपिलधारवाडीत भीतीचे वातावरण कायम; भूगर्भ सर्वेक्षण पथकाची पाहणी, तातडीने पुनर्वसनाचे निर्देश
- कपिलधारवाडीत भीतीचे वातावरण कायम; भूगर्भ सर्वेक्षण पथकाची पाहणी, तातडीने पुनर्वसनाचे निर्देश
- बीड प्रतिनिधी : पाली अंतर्गत कपिलधारवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या व अतिवृष्टीमुळे जमिनीचा पृष्ठभाग खचला असून, अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत तसेच रस्त्यांवर खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- या भूस्खलनग्रस्त क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे (GSI) संचालक मेगो चासी आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक संदीपकुमार शर्मा यांनी बुधवारी स्थळाची पाहणी केली. त्यांनी प्राथमिक निरीक्षण अहवाल सादर करत नमूद केले की, संबंधित भागात पाण्याचा नैसर्गिक निचरा न झाल्याने भूपृष्ठाखाली पाणी साचले आहे आणि त्यामुळे भूस्खलनाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. काही कुटुंबांवर तत्काळ धोका असल्याने त्यांचे तात्पुरते पुनर्वसन आवश्यक असल्याचे त्यांनी सुचविले.
- या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासनास प्रतिबंधात्मक आणि पुनर्वसनात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अधिकारी बैठक घेऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला.
- तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने स्थलांतरित कुटुंबांसाठी मन्मथस्वामी देवस्थान परिसरात तात्पुरती निवारा व अन्नाची व्यवस्था केली आहे. महिलांना साड्या व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून, मदतकार्य व पाहणीसाठी अधिकाऱ्यांची सतत उपस्थिती आहे.
- प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले की, “परिस्थिती नियंत्रणात असून प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे.
error: Content is protected !!