कपिलधारवाडी गाव संकटात पण देवस्थान धावून येईना..
कपिलधारवाडीचे संकट अभिनेत्यांना दिसते मात्र देवस्थानाला नाही.
बीड प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे कपिलधारवाडी गावातील घरांना तसेच रस्त्याला तर पूर्ण गावातील घरांना चिरा पडल्या आहेत. पण अनेक वर्षांपासून कपिलधारवाडी ग्रामस्थांनी देवस्थानाला मदत करत आहेत. परंतु आता सध्या ग्रामस्थ संकटात असताना देवस्थान मात्र धावुन येत नाही. बीड जिल्ह्यातील अनेक देवस्थाने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले परंतु कपिलधार येथील देवस्थान ची ट्रस्ट च्या कमिटीला गाव नसलेले बरे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कपिलधारवाडी संकटातून बाहेर पडेना, कपिलधार संस्थान तिजोरी कधी उघडेल, कपिलधार संस्थानने दायित्व व दानत दाखवत तिजोरी उघडावी अशी मागणी आता परिसरातून होताना पाहायला मिळत आहे.
शेतकरी किती मोठा दाता आहे हे पाहायचं असेल तर त्यांनी विविध देवस्थानांना सढळ हाताने देणगी दिली आहे. मात्र आता शेतकऱ्यावर वेळ आली असता हात पसरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातच बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी वर आलेलं माळीन दुर्घटनेसारखं संकट मुंबई वरून आलेल्या अभिनेत्यांना दिसते मात्र शेजारी असलेल्या कपिलधार देवस्थान कमिटीला दिसत नाही. मन्मथस्वामी मंदिर निर्मितीपासून ते आजपर्यंत ज्या कपिलधारवाडीने सढळ हाताने देवस्थानला मदत केली त्या कपिलधारवाडीच्या लोकांना रस्त्यावर झोपायची वेळ आली. त्यांच्यासाठी निदान धान्य,कपडे इतर स्वरूपात मदत करणे अपेक्षित होते.
कपिलधार देवस्थानला सरकारने अनेक हजारो कोटीचा निधी दिलेला आहे. मात्र तेथील विकास आजपर्यंत कुठे दिसत नाही. दरवर्षी येणार करोडो रुपयांचं दान कुठे जात आहे. समाज उपयोगी एकही उपक्रम संस्थानाकडून राबविला जात नाही. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यावर आलेलं अतिवृष्टीचं संकट आलेलं असताना सर्व संस्थानांनी करोडोने मदत केली मात्र कपिलधार देवस्थान कुठे मदत करताना दिसून आले नाही. जवळ असलेल्या कपिलधारवाडी वर माळीन दुर्घटनेसारखं भयानक संकट असताना मात्र कपिलधार देवस्थानने दानत दाखवणं अपेक्षित होतं.