लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार?
- लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार?
- फेसबुकवर केली भावनिक पोस्ट ; फेसबुक वरची पोस्ट आता चर्चेत..

- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. हाके यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर राजकीय वर्तुळात आता चर्चाना उधाण आलं आहे.
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हाके यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करून चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो. भांडत गेलो. मात्र, आता शत्रूची संख्या वाढतेय. पण आता सहन होत नाही. मी लवकरच भूमिका जाहीर करेन, असं हाके म्हणाले आहेत. हाके यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
- उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात. मला पाठिंबा देत राहिलात. मी तुमचे आभार मानावेत, तेवढे कमी आहेत. मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो. भांडत गेलो, ओबीसींच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो. लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली. हल्ले झाले, झेलले, पण आता सहन होत नाही. उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत, त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो, असे हाके पुढे म्हणाले.
- अशा पोस्टमुळे आता नेमकं लक्ष्मण हाके काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. आता त्यांनी फेसबुक वर पोस्ट केली आहे काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेले आहे. लक्ष्मण हाके यांनी अशी पोस्ट का केली यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
error: Content is protected !!