6.5 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

बीड पुन्हा हादरलं..! पत्रकाराच्या मुलाचा माने कॉम्प्लेक्स समोर छातीत चाकू खूपसून खून..

  • बीड पुन्हा हादरलं..! पत्रकाराच्या मुलाचा माने कॉम्प्लेक्स समोर छातीत चाकू खूपसून खून..
  • अवघ्या अर्ध्या तासात आरोपी पकडला..
  • बीड प्रतिनिधी – बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात रात्री 8.30 च्या सुमारास युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीत यश देवेंद्र ढाका वय 22 वर्ष याच्या छातीवर चाकूचे वार करण्यात आले. छातीत आरपार चाकूचे वार गेल्याने तो जमिनीवर कोसळला. दरम्यान पोलिसांनी घटनेच्या अर्ध्या तासातच आरोपीला जेरबंद केले आहे. पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा तो मुलगा आहे. शहरात गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यश देवेंद्र ढाका वय २२, रा. बीड या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली आहे. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
  • गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून झाला असल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट झाला आहे .

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!