ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या – डॉ ज्योती मेटे
- ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या – डॉ ज्योती मेटे
- बीड (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या कडे केली आहे.
- राज्यात सध्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांत अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बीड जिल्ह्यात पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने कहर केला तर पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. तसेच, शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यानं मदत करावी
error: Content is protected !!