8.9 C
New York
Thursday, November 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – अभिजीत पवार 

  • ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – अभिजीत पवार 
  • बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा. सतत गेल्यात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे या पावसाने शेतकरी अडचणी सापडला आहे. पावसाने शेतात आजही पाणी साचून शेतातील पीक पूर्णपणे कुजत आहे. नदीकाठावरील शेती तर पूर्णपणे खरडून गेली आहेत. शेतकर्‍यांच्या तोंडचा घास निघून गेला आहे, शेतकर्‍यांनी जगावं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अभिजीत पवार यांनी केली आहे.
  • जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने हजेरी लागली आहे. या झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.
  • बीड जिल्हयात अनेक ठिकाणी सोयाबीन, कांदा, बाजरी , कपासी इतर तरकारी पिकांमध्ये पाणी साठल्याने ही पिके पाण्यात बुडालेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना लाखोंचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात अधिक भर म्हणजे बाजारपेठेमध्ये दर कोसळल्याने शेतकर्‍यांना पावसाचा व दरांचा असा दुहेरी फटका बसत आहे. सोयाबीन पिकामध्ये पाणी साठल्याने सोयाबीन खराब होऊन कीड लागून खराब झाली आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले असून शेतकरी अक्षरशः उघड्यावर आले आहेत. दरम्यान प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा करून शेतकर्‍यांना तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी अभिजीत पवार यांनी केली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!