8.7 C
New York
Thursday, November 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी

  • महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी..
  • नवी दिल्ली, दि.10 : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत.
  • उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत मतदान झाले. एकूण ९८ टक्के मतदान झाले असून यामध्ये एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना एकूण 752 मतांपैकी पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली आहेत तर इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी 300 मते मिळाली आहेत.
  • उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सकाळी 10 वाजता संसद भवनात सुरू झाली. देशभरातील खासदारांनी आपले मतदान केले. सायंकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काटेकोर सुरक्षा व्यवस्था आणि पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेचा निकाल सायंकाळी 7:30 वाजता राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी यांनी जाहीर केला. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया शांततेत आणि पूर्णपणे नियमांचे पालन करून पार पडल्याचे स्पष्ट केले.
  • सी.पी. राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते असून, त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी झारखंड येथेही राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!