आपण जिंकलो मनोज जरांगे पाटील यांची घोषणा.,हैदराबाद गॅझेट लागू होणार..
- आपण जिंकलो मनोज जरांगे पाटील यांची घोषणा.,हैदराबाद गॅझेट लागू होणार..
- जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य..
- मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे तीव्र उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले असून, राज्य सरकारने जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवले आहे. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्र राजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. जरांगे यांनी मांडलेल्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी हे शिष्टमंडळ कसोशीने प्रयत्न करत आहे.
- आझाद मैदानावर जरांगे यांच्या उपोषणाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले असून, मराठा समाजाचा पाठिंबा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यामुळे सरकारवर दबाव वाढला आहे. शिष्टमंडळाच्या या भेटीमुळे सरकार आणि आंदोलकांमधील तणाव निवळून आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच मार्ग निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
- मंत्रिमंडळ उपसमितीने खालील मागण्या मान्य केल्या
- सातारा गॅझेटीयर,पुणे व औंध संस्थान गॅझेटीयर ची कायदेशीर तपासणी करून अंमलबजावणी करण्यात येईल..
- मराठा आंदोलकावर दाखल असलेले गुन्हे सप्टेंबर पर्यंत मागे घेण्यात येतील.
- मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत एक आठवड्याच्या आत जमा करणार..
- बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना शासकीय सेवेत नोकरी देणार..
- मराठा कुणबी एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी दोन महिन्याची मुदत माघितली..
error: Content is protected !!