12 वी राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेचे बीडच्या विद्यार्थ्यांना 9 पदके
- 12 वी राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेचे बीडच्या विद्यार्थ्यांना 9 पदके
- बीड प्रतिनिधी: भारतीय शालेय क्रीडा महासंघ मान्यता प्राप्त भारतीय युनिफाईट महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन व सोलापूर जिल्हा युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ व १३ जुलै २०२५ या कालावधीत सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 12 वी राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलापूर शहर भाजपा अध्यक्षा सौ. रोहिणीताई तडवळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी राज्य युनिफाईट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खंदारे, महासचिव मंदार पनवेलकर, जिल्हा युनिफाईट संघटनेचे सचिव भीमराव बाळगे, खजिनदार इक्बाल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
- समाजात वावरताना आत्मरक्षण काळाची गरज बनत आहेत स्पर्धेची चिकाटी आणि प्रयत्न करण्याची उर्मी बालवयात आणि बालपणात शिकायला मिळाली तर यश कसे संपादन करता येऊ शकते याची साक्ष बीड च्या कराटे खेळाडूंनी मुंबई येथील झालेल्या कराटे स्पर्धेत 10 पदके जिंकून साक्ष दिली.
- राज्यस्तर युनिफाईट अजिंक्यपद विजयी खेळाडूंना प्रथम द्वितीय व तृतीय याप्रमाणे सुवर्ण, रौप्य व काश्य पदकाचे तसेच प्राविण्य प्राप्त व सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले
- कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी यांनी केले यावेळी खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सब-ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर गटातून विविध वजनी व वयोगटातून प्रथम क्रमांक प्राप्त मुले-मुली खेळाडूंची निवड राष्ट्रीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे. त्या विजयी खेळाडूंमध्ये श्रेयस जोगदंड (गोल्ड मेडल), राजरत्न कापसे (गोल्ड मेडल), अर्णव हांगे (गोल्ड मेडल),शिवा प्रजापती (गोल्ड मेडल) व पवनकुमार जाधव (सिल्वर मेडल), वैभवी आहेर(सिल्वर मेडल), आदित्य राठोड (सिल्वर मेडल), व आहेर वेदांत ( ब्राँझ मेडल), कार्तिकी वायकर ( ब्राँझ मेडल)यांनी सहभाग घेऊन हे पारितोषिक मिळवले आहे. या सर्व खेळाडूंना मेडल व सन्मानचिन्ह देऊन आयोजकांनी सन्मानित करण्यात आले. दुर्दम्य, आत्मसन्मान, आत्मविश्वास, मनातला उत्साह, द्रड चिकाटी आणि प्रचंड इच्छाशक्ती सकारात्मक वृत्ती असली की माणूस असाध्य ते साध्य करू शकतो याची साक्ष आज बीडच्या 9 कराटे खेळाडूंनी सोलापूर येथील स्पर्धेमध्ये मिळवलेले विजयाची साक्ष देते. या सर्व खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे बीड जिल्ह्याचे मुख्य कराटे प्रशिक्षक तथा बीड जिल्हा सचिव युनिफाईड वेल्फेअर असोसिएशनचे सचिव एडवोकेट नितीन पवार सर यांची सुद्धा सर्वत्र कौतुक होत आहे की त्यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आज या पदकापर्यंत पोहोचवले व त्यांना मोलाचे सहकार्य महिला प्रतिनिधी तथा युनिफाईड वेलफेअर असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट आरती सतकर यांनी केले.
error: Content is protected !!