स्व. मुरलीधर विठ्ठल मोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ पहिली ते सातवी च्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक घेणार दत्तक – ॲड. गणेश मोरे
बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील वडगाव कळसंबर येथील भूमिपुत्र आणि बीड बालाघाटावरील पहिले एस. टी आय अधिकारी स्व. मुरलीधर विठ्ठल मोरे यांच्या पाहिले पुण्यस्मरणार्थ वडगाव कळसंबर चे सरपंच सुशाला आसाराम मोरे यांनी तसेच मोरे कुटुंबियांनी पहिली ते सातवी च्या जिल्हा परिषद शाळा वडगाव (क)च्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षिणक दत्तक घेणार असल्याचे ॲड. गणेश मोरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे म्हटले आहे.
स्व. मुरलीधर विठ्ठल मोरे यांना सामाजिक कार्याची सतत आवड होती. ते बालाघाटावरील पाहिले एस टी आय अधिकारी होते. औरंगाबाद विद्यापीठात स्व. मुरलीधर विठ्ठल मोरे हे एम. ए. पोल्टिकल सायन्स गोल्ड मेडलिल्स्ट होते. तसेच तत्कालीन एम . पी एस सी परीक्षेत ते महाराष्ट्रात पहिले आले होते. मुरलीधर विठ्ठल मोरे बालाघाटावरील पहिले सुपर क्लास वन अधिकारी होते. त्यांच्या कार्यकिर्तीमध्ये त्यांना राज्य शासनाकडून उत्कृष्ट कार्यकेल्या बद्दल पुरस्कार देण्यात आलेला होता. त्या काळात स्व. मुरलीधर विठ्ठल मोरे राज्यामध्ये पहिले आले असल्याने त्यांचा अनेक विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा या करिता हा संकल्प ॲड गणेश मोरे यांनी राबवण्याचे ठरवले आहे. त्यांनी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी सेल टॅक्स ऑफिसर म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य बजावले होते. स्व. मुरलीधर विठ्ठल मोरे यांचे मागील वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा पुतण्या सामाजिक आणि शैक्षणिक कामात अग्रेसर आहेत. आपल्या चुलत्यांचा आदर्श घेत ॲड. गणेश मोरे यांनी पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षिणक दत्तक घेण्याचे ठरवले आहे.
चौकट
स्व. मुरलीधर मोरे यांना राजकारणाची सुद्धा आवड होती.
स्व. मुरलीधर विठ्ठल मोरे यांना राजकारणाची आवड होती. मुरलीधर विठ्ठल मोरे हे 15 वर्ष वडगाव सेवासहकारी सोसायटी चे बिनविरोध चेअरमन होते. ते हयात असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. गणेश मोरे यांनी वडगाव ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि परिसरात कमी वयाचा सरपंच म्हणून जनतेतून ॲड. गणेश मोरे हे निवडून आले होते. आणि आता ॲड. गणेश मोरे यांच्या मातोश्री सुशाला आसाराम मोरे या वडगाव कळसंबर येथील विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत आहेत. एका नवा आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे ठरवले आहे.