विदर्भ गौरव पुरस्काराने जयदीप अण्णा वंजारे सन्मानित.
- विदर्भ गौरव पुरस्काराने जयदीप अण्णा वंजारे सन्मानित.
- बीड प्रतिनिधी : ग्रामीण विकास प्रकल्प येळंबघाट येथील वृक्षमित्र जयदीप अण्णा वंजारे यांना विदर्भ गौरव पुरस्कार देऊन कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीम बाग चौक ,नागपूर येथे सन्मानित करण्यात आले सदरील पुरस्कार वीर शिव छत्रपती संघटना एस.आर.एन. फिल्म प्रोडक्शन न्यूज इंडिया 24 यांच्या विद्यमाने सदरील पुरस्कार सोहळा दिनांक 14/6/2025 रोजी संपन्न झाला.
- सर्वप्रथम कविवर्य सुरेश भट यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे राजे मुधोजी भोसले होते तसेच सागर निकम सिनेअभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, झी मराठी, सोनी मराठी, मराठी चित्रपट जीवा शिवा फेम मराठी निर्माते मधुर भांडारकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करून वृक्ष मित्र जयदीप अण्णा यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी एस.आर.एन. फिल्म प्रोडक्शन टीम नागपूरचा संपूर्ण परिवार उपस्थित होता.
- श्री जयदीप अण्णा यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वत्र मराठवाड्यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जयदीप अण्णा वंजारे यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले तसेंच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
error: Content is protected !!