माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे अपघाती निधन..
- माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे अपघाती निधन..
- बीड प्रतिनिधी – माजलगावचे माजी आमदार तथा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या आर. टी. देशमुख यांचे रस्ता अपघातात निधन झाले. तुळजापूर – लातूर रस्त्यावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला असून त्यांना लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करीत होते. सोमवारी दुपारी त्यांच्या वाहनाचा गंभीर अपघात झाला. यात आर. टी. देशमुख जखमी झाले त्यांना तातडीने लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक होती परंतु उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले असल्याची माहिती आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी अनेक विकास कामे केले आहेत. आर. टी. देशमुख यांच्याकडे बीड जिल्ह्यातील राजकारणाचा एक सुसंस्कृत चेहरा म्हणून पाहिले जाते. सुरुवातीला जिल्हापरिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते. नंतर ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले. भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी ते एक होते. दीर्घकाळ भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पहिले होते. मध्यंतरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सक्रिय राजकारणातून बाजूला गेले होते. आज त्यांचे अपघाती निधन झाले आहे. देशमुख कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी आहे.
- भावपूर्ण श्रद्धांजली 💐
error: Content is protected !!