नेकनूर परिसरात गोळीबार एकाचा मृत्यू..
- नेकनूर परिसरात गोळीबार एकाचा मृत्यू..
- बीड प्रतिनिधी – नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत लिंबागणेश परिसरात पवनचक्की प्रकल्पावर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सिक्युरिटी गार्डने रात्रीच्या सुमारास केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मध्ये रात्री दोनच्या सुमारास चोर चोरीच्या उद्देशाने या पवनचक्की प्रकल्पावरती आल्यावर सुरक्षा गार्डने गोळीबार केला या गोळीबारामध्ये मृत्यू झाला आहे.

- बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हातात लाट्या-काठ्या आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला त्यावेळी सिक्युरिटी गार्ड असलेल्या व्यक्तीने या लोकांच्या दिशेने गोळीबार केला यामध्ये एकाचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पवनचक्की पासून एक किलोमीटर अंतरावर सदरील गोळीबार झालेल्या चोरट्याचा मृतदेह आढळला आहे.
error: Content is protected !!