9.4 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी केल्या 606 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या..

पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी केल्या 606 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या..

बीड प्रतिनिधी – गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सोयीनुसार पोलीस कर्मचारी बदल्या करून घेण्यात अग्रेसर होते. आपल्या आवडीनुसार पोलीस स्टेशन भेटण्यासाठी धावपळ करत होते. परंतु सध्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. सध्या बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. हा निर्णय घेतल्यामुळे स्थानीक पातळीमधून एस पी नवनीत कॉवत साहेब यांचे स्वागत केले जात आहे. परंतु एकीकडे पोलिस कर्मचारी यांचा नाराजीचा सूर असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून भैय्या, अण्णा, काका, दादाच्या आशीर्वादाने खुर्चीवर चिकटून बसलेले पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अखेर नवनीत कॉवत यांनी गुरुवारी (दि.२२) बदल्या केल्या आहेत. आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही वशिलेबाजी अथवा पैशांचा घोडेबाजार न भरविता तब्बल ६०६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. एसपींनी बदल्यांसाठी राबविलेला पारदर्शी कारभार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून अनेकांना यामुळे मात्र धक्का बसला आहे.

पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी स्वतः बदल्यांमध्ये लक्ष घालून कालावधीपूर्ण झालेले आणि निकषात बसणाऱ्या कर्मचारी आणि सहाय्यक फौजदारांना बदलीपासून संरक्षण मिळणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते. खालील प्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत कुठे कोणते कर्मचारी

पहा यादी..

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!