- राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार..
- पुणे प्रतिनिधी – राज्य बोर्डाकडून उद्या दुपारी १ वाजता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून होतं.
- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण बारावीचा निकाल उद्या म्हणजे ५ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने नुकतीच ही घोषणा केली. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहयला मिळेल. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.
- माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. ५ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
- निकाल पाहण्यासाठी वेबसाईट..
- १. https://results.digilocker.gov.in
- २. https://mahahsscboard.in
- ३. http://hscresult.mkcl.org
- ४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com