महाराष्ट्र दिन व कामगार दिन वृक्षारोपण करून साजरी केला :- जयदीप वंजारे
शब्दाचे बादशहा बनवू नका, तर आचरणाचे धनी बना या वरील शब्दाप्रमाणे गेले अनेक वर्षांपासून या उजाड रानावर झाडे लावा झाडे जगवा मोहीम राबवत आहे ही पृथ्वीवरील पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहेत मानवाचे अस्तित्व निसर्गाचा समतोल आणि पर्यावरणाची टिकाव धरण्याची क्षमता यामध्ये झाडांचे योगदान अमूल्य आहे पण दुर्दैवाने मानवाने प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास केल्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टी धोक्यात आली आहे अशावेळी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश केवळ प्रचाराचा मुद्दा नसून ती काळाची गरज आहे असा संदेश वृक्ष मित्र जयदीप अण्णा आपल्या प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न करत आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित प्राध्यापक गौतम सर यांनी मार्गदर्शन केले तसेच पत्रकार अशोक काळकुटे, धमानंद (भाऊ) वंजारे, भालेकर,प्रज्ञादीप वंजारे, शफिक भैया, कवडे सर, (चाकरवाडी) शेख इस्माईल,धम्मदीप वंजारे, विजय पायाळ,हजारे,हरिभाऊ डोईफोडे, गौतम गडशिंगे, (नेकनूर) शफिक भैया, आर्यन वीर(पाली),शिवाजी पवार (चाकरवाडी) असे अनेक वृक्षप्रेमी उपस्थित होते..!