8.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

माऊली दादांची समाधी ही संजीवनी आहे बाळासाहेब महाराज गाडे यांचे प्रतिपादन..!

माऊली दादांची समाधी ही संजीवनी आहे बाळासाहेब महाराज गाडे यांचे प्रतिपादन..!

माऊली दादा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहेत ; विष्णूचा अवतार आहेत..

बीड प्रतिनिधी – माऊली दादांना बाळनाथ महाराजांचे दर्शन झाले तेव्हा दादांच्या जीवनातले कोडे सुटले. माऊली दादा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहेत. विष्णूचा अवतार आहेत, चाकरवाडी चे माऊली म्हणजे आळंदीचे माऊली आहे. तप केले की त्याचे फळ प्राप्त होते. ज्या दिवशी आपल्या जीवनात श्री गुरु घडेल त्या दिवशी दारिद्रय चे दुखः संपते. विसाव्या शतकातील महान संत विभूती वै. ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र चाकर वाडीकर यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री . ह. भ प तपोनिधी शंतिब्रम्ह महादेव महाराज तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्य तपोनिधी बाळनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहाची तिसऱ्या दिवसाची किर्तन सेवा श्री.ह. भ. प बाळासाहेब महाराज गाडे जामखेड यांचे सुश्राव्य असे तिसऱ्या दिवसाची किर्तन सेवा संपन्न झाली. महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे अभंग सोडवून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले. महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना संतांची सेवा करून सुखी आनंदी रहा असा संदेश दिला.

महाराजांनी श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥ राजयाची कांता काय भीक मागे ।मनाचिया जोगे सिध्दि पावे ॥ कल्पतरुतळवटीं जो कोणी बैसला । काय वाणी त्याला सांगिजोजी ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । आतां उध्दरलों गुरुकृपें ॥ या अभंगावरती चिंतन केले.

जीवब्रह्मैक्य ज्ञानदान करण्यामध्ये ईश्वरापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा श्रीगुरूचा पाठिंबा असेल तर इतर ज्या रिद्धिसिद्धी किंवा संसारिक सुखे यांची पर्वा कोण करील. मनाप्रमाणे सर्व ऐश्वर्य भोगण्यास मिळणाऱ्या राजाच्या बायकोला भीक मागावयाला जाण्याची पाळी येईल काय? किंवा कल्पतरूखाली बसलेल्या पुरूषास काय कमी आहे. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने माझा उद्धार झाला म्हणून मी संसार समुद्रांतून पार पडलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

महाराज सांगतात दादांची समाधी ही संजीवनी आहे तसे पाहिले तर आळंदीच्या माऊलींची, चाकर वाडींच्या माऊलींची, बाळनाथ महाराज यांची समाधी ही संजीवनी आहे. जो या चाकरवाडी मधे येईल दादांचे नामस्मरण करेल माऊली माऊली नामस्मरण करेल आणि या ठिकाणचा महाप्रसाद घेईल त्याला कल्पवृक्ष सारखे पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जो देवाचे नाव आवडीने घेईल त्याला कशाचीच चिंता करायची गरज नाही. संत हे कामधेनू आहे, संत हे परीस आहेत. सदगुरू हे खूप मोठे आहेत, परीस पेक्षा सद्गुरू मोठे आहेत.

महाराजांनी त्यांच्या गोड वाणीतून भाविक भक्तांना गोड असा संदेश दिला. गोड अश्या अभंगातून भाविक भक्त किर्तन एकूण भारावून गेले. आणि गोड वाणीतून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.

गायनाचार्य – पिंपळे महाराज , रोडे महाराज, रज्जाक महाराज, हरीभाऊ महाराज काळे , हनुमंत महाराज घोलप, मृदंगाचार्य – अविष्कार महाराज क्षीरसागर, त्रिंबक महाराज शेळके तसेच यावेळी चाकरवाडीचे आदर्श पोलिस पाटील नानासाहेब काकडे, पत्रकार अभिजीत पवार, बाबासाहेब मोरे, मंचीक पवार ,तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त आणि महाराज मंडळी तसेच मोठया प्रमाणात ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!