मौजे अंधापुरी घाट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..
- मौजे अंधापुरी घाट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..!
- बीड प्रतिनिधी : बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेने व वै ह.भ.प गिरी महाराज व ज्ञानेश्वर माऊली,सुदाम देव महाराज, गुरुवर्य शांती ब्रह्म रामहरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे व महादेव महाराज (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्यावतीने वार सोमवार दि. २१/४/ २०२५ रोजी मौजे अंधापुरी घाट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
- सात दिवस चालणाऱ्या या सप्ताह निमित्त गावामध्ये रोज वेगवेगळ्या नामांकित कीर्तनकारांचे अमृततुल्य असे किर्तन सेवा होणार आहेत तसेच भजन,प्रवचन,हरिपाठ व हरीजागर असे कार्यक्रम होणार आहेत.
- अखंड हरिनाम सप्ताह निमित्त गावामध्ये रोज गावकऱ्यांच्या वतीने व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्यावतीने सप्ताह निमित्त महापंगतीचे आयोजन करण्यात आले असून रोज सकाळ व संध्याकाळ गावामध्ये वेगवेगळ्या महापंगती होणार असून परिसरातील भावीक भक्तांनी,नागरिकांनी व गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सोमवार दि.२८/ ४/ २०२५ रोजी श्री गुरुवर्य ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे (मठाधिपती बंकट स्वामी संस्थान निनगुर,आळंदी,पंढरपूर) यांचे सकाळी ११ ते १ या वेळेत अमृततुल्य असे काल्याचे किर्तन होणार असून नंतर लगेचच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी परिसरातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी व नागरिकांनी तसेच गावकऱ्यांनी काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
error: Content is protected !!