ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठया उत्साहात साजरी..!
- ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठया उत्साहात साजरी..!
- बीड प्रतिनिधी : बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.
- जयंतीनिमित्त गावचे सरपंच पप्पू जगताप, पत्रकार दिपक वाघमारे, ग्रामरोजगार सेवक बाबू अण्णा टेकडे,सोमनाथ टेकडे, वैभव जगताप, अंगणवाडी सेविका शोभा कागदे,मंकाबाई घोरपडे आदि यावेळी उपस्थित होते.
- सरपंच पप्पू जगताप यांनी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ फोडून जयंती निमित्त महामानवाला अभिवादन केले. उपस्थित सर्वांनी यावेळी महामानवाला जयंतीनिमित्त वंदन केले.
- भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे.. भारताच्या इतिहासातील तेजस्वी असे प्रज्ञासूर्य ज्यांच्या ज्ञानतेजाने कोट्यवधी जनतेची आयुष्ये उजळली…
- आधुनिक भारत घडवून आणण्यासाठी अमूल्य असे योगदान देणारे कृतिशील महापुरुष… स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्यांनी स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय अशा तत्त्वांवर आधारित राज्यघटना तयार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत भारताच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरविली.. ज्यांनी हजारो वर्षे बहिष्कृत करण्यात आलेल्या समाजाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली व त्यांना संघटित केले; त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, अन्यायाविरूध्द लढण्याची जिद्द, वाईट चालीरीती सोडून देण्याची प्रवृत्ती, शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला असे महापुरुष…
- आपल्या क्रांतिकारी विचारांनी ज्यांनी सामाजिक अभिसरण घडवून आणत राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक जीवनात अस्पृश्यांना मानाचे स्थान मिळवून दिले आणि वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार मिळवून दिले असे महानायक… पहिले भारतीय अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित….ज्यांनी दीन दलित समाजाला शांती आणि समता यांची शिकवण देणारा बौद्ध धम्म दिला… या विविध क्षेत्रांत काम केलेला जगात बाबासाहेबांसारखा एखादाच नेता म्हणून त्यांचे स्थान अढळ आहे.
- भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व जयंती निमित्त त्यांना सर्वांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
error: Content is protected !!