23.4 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

मयत महिलेच्या नावावर चे लाखो रुपये केले गायब.?

  • मयत महिलेच्या नावावर चे लाखो रुपये केले गायब.?
  • द.माजलगाव पीपल्स अर्बन को ऑफ सोसायटी लिमिटेड माजलगाव शाखेतील प्रकार..
  •  बीड प्रतिनिधी : मयत महिलेच्या नावावरील लाखो रुपये गायब केल्याचा प्रकार द माजलगाव पीपल्स अर्बन को ऑफ सोसायटी लिमिटेड माजलगाव शाखेत घडलेला असून या संदर्भात अर्जदार नितीन यादवराव जाधव यांनी पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांना तक्रार अर्ज दाखल केला आहे.
  • द.माजलगाव पीपल्स अर्बन कॉ ऑफ सोसायटी लिमिटेड माजलगाव शाखा व्यवस्थापक व चेअरमन- निशांत साळवे, भारत दादाराव त्रिभुवन, रवींद्र ज्ञानोबा साळवे, गंगाबाई ज्ञानोबा साळवे, नवनाथ दादाराव त्रिभुवन,अक्षय दिलीप त्रिभुवन- शाखा व्यवस्थापक यांनी संगणमत करून मुक्ताबाई यादवराव जाधव (आई) दिनांक-6/10/2024 रोजी मयत झाल्यानंतर त्यांच्या खात्यातील 12 ते 15 लाख रुपये बळकावले असल्याची तक्रार तक्रारदार नितीन यादवराव जाधव यांनी पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांना केली आहे.
  •  या बाबत तक्रार अशी की..
  •  माझी आई मुक्ताबाई यादवराव जाधव या दिनांक-6/10/2024 रोजी वयोमानानुसार मयत झालेल्या आहेत.. माझ्या आई मुक्ताबाई यांचे द.माजलगाव पीपल्स अर्बन को.ऑफ क्रेडिट सोसायटी लि.या बँकेत आईचे खाते होते त्याचा खाते क्रमांक 3169 असा आहे, माझी आई गाई म्हैस घेऊन स्वतः सांभाळत होती व त्यापासून मिळणारे उत्पन्न बँकेत जमा करत होती तसेच माझ्या आईकडे किराणा दुकान होते व ते दुकान माझ्या आई या त्याच्या राहत्या घरात चालवत होत्या व त्यापासून मिळणारे उत्पन्न वरील बँकेत जमा करत होत्या..
  •  माझ्या आईने संपूर्ण तिची मिळकत वर नमूद केलेल्या बँकेत तिच्या खात्यामध्ये ठेवलेली आहे, माझ्या आई सोबत कोणीही राहत नव्हते,त्याचा गैरफायदा घेऊन चेअरमन द. माजलगाव पीपल्स अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी यांचा सक्का मोठा भाऊ याने अनेक वेळा माझ्या आईच्या खात्यामधून स्वतःच्या खात्यामध्ये रक्कम रुपये- 1,40,657 रुपये दिनांक-8/4/2024 रोजी ट्रान्सफर केलेले आहेत.सदरील बँकेला अकाउंट स्टेटमेंट मागितले असता, अकाउंट स्टेटमेंट पूर्ण दिलेले नाही.. दिनांक-1/4/ 2024 ते 17/2/ 2025 पर्यंतचे स्टेटमेंट सदरील बँकेने दिलेली आहे. त्यामध्ये असा अपहार झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता असे बँकेच्या चेअरमनच्या नातेवाईकांनी दुसऱ्याच्या खात्यामध्ये व्यवहार करणे संशयास्पद आहे, सदरील मुक्ताबाई जाधव यांचा मी मुलगा असताना रवींद्र साळवे यांनी मला कसलीही कल्पना न देता व रक्कम का काढली.?कशासाठी काढली.? याची माहिती न देता संपूर्ण रक्कम स्वतःच्या नावे ट्रान्सफर करून घेतली आहे.
  •  माझी आई ही वयोवृद्ध असल्यामुळे व तिला कसल्याही प्रकारचे कायदेशीर ज्ञान नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन वर नमूद आरोपीने भावाला हाताशी धरून व मामाला हाताशी धरुण सदरील माझ्या आईच्या बँकेतील  गैरव्यवहार केलेला आहे त्यास माझी सहमती नव्हती..
  •  चेअरमन द.माजलगाव पीपल अर्बन को ऑफ सोसायटी ली.आर बी एल बँकेच्या बाजूला गढी रोड माजलगाव ता. माजलगाव जि बीड यांनी आजपर्यंत माझ्या आईच्या खात्यातून जवळपास 12 ते 15 लाखाचा गैर व्यवहार केल्याचे दिसून येत आहे. माझ्या आईच्या नावे त्याच बँकेत एफडी होती..
  •  माझी आई मयत झाल्यावर सुद्धा कसल्याही प्रकारचे वारस प्रमाणपत्र न पाहता व्यवहार झालेला आहे,तो बेकायदेशीर आहे तसेच रिझर्व बँकेच्या- क्रेडिट ऑफ सोसायटीच्या अटी शर्तीचा भंग केल्याचे दिसून येत आहे.
  •  सदरील अपहार केलेली रक्कम मला कायदेशीर वारस हक्काने परत देणे बाबत कायदेशीर नोटीसीद्वारे मागणी केली असता आरोपींनी नोटीसला कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही व अद्याप पर्यंत मला रक्कम दिलेली नाही.
  •  तरी मा.साहेबांना नम्र विनंती वरील प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आपसात संगणमताने आरोपींनी माझ्या आईची व माझी फसवणूक केलेली आहे.तरी वरील आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी तक्रारदार नितीन यादवराव जाधव यांनी पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांच्याकडे केली आहे..

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!