पोलीसांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने खुनी हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची जामीन फेटाळला – ॲड. संतोष गहिनीनाथ घोलप
- पोलीसांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने खुनी हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची जामीन फेटाळला – ॲड. संतोष गहिनीनाथ घोलप
- बीड (प्रतिनिधी) सुरळेगांव शिवारातील गोदावरी नदी पात्रात दोन ट्रॅक्टर व एक लोडर वाळु चोरी करीत असल्याची माहिती दि. २७/०२/२०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास चकलांबा पोलीसांना मिळाल्यामुळे तेंव्हा गोदावरी नदी पात्रात पोलीस गेले असता तेथे एक लोडरच्या सहाय्याने दोन ट्रॅक्टरमध्ये वाळु भरत होते, त्याशेजारी दोन हायवा वाळु भरत होते, त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले व सदरील वाहने पोलीस स्टेशन चकलांबा येथे घेवून येत असतांना १) सुनिल नरवडे, २) घनश्याम नरवडे, ३) संभाजी नरवडे, ४) शंभु नामदेव आरबड व त्यांच्या सोबत एक अनोळखी ईसम सर्व रा. बळेगांव ता. अंबड जि. जालना या सर्वांनी पोलीस शिपाई इंगोले व पोशि प्रशांत घोंगडे यांना मारहाण करून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर लोडर घातले त्यामुळे ते गंभीर जखमी होवून फिर्यादीचे हात फॅक्चर झाले होते. त्यामुळे उपरोक्त आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन चकलांबा येथे आरोपींविरूध्द कलम २१ (१), २१ (२) खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ व १०९, ११५ (२), १२१(२), १३२, १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ नुसार पो.शि. श्री. इंगाले यांच्या फिर्यादीरून गुन्हा नोंद केला. सदर आरोपीपैकी सुनिल नरवडे व शंभु नामदेव आरबड यांनी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, बीड येथे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. सदरील अर्जावर सुनावणी होवून फिर्यादीच्या वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपींचा मा. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. फिर्यादीतर्फे ॲड. संतोष गहिनीनाथ घोलप यांनी काम पाहिले तर त्यांना सहकार्य ॲड. पठाण खालेक, ॲड. नितीन पवार यांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!